
दिल्लीहून बँकॉकला जाणाऱया एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने दुसऱया प्रवाशावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार बुधवारी समोर आला. ही घटना एअर इंडियाच्या फ्लाईट ए12336 मधील बिझनेस क्लासमध्ये घडली. पीडित व्यक्तीने अद्याप यासंबंधी तक्रार दाखल केली नाही. तसेच आरोपीने केलेल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. एअर इंडियाने याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाला दिलीय. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्याकिरुद्ध कारवाई केली जाईल, असे हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी बुधवारी दिली.