शिवतारेंचा पक्ष, चिन्हाचा एअर बलून प्रचार; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पुरंदर मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या पक्षाचे चिन्ह असलेला एअर बलून कोणतीही परवानगी न घेता रॉयल स्टे इन लॉजिंगच्या गच्चीवर बांधून आचारसंहितेचा भंग करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांच्याविरोधात हजपसर (फुरसुंगी) पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अरुण पवार असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी शेखर अमरदीप कांबळे यांनी फिर्याद दिली होती.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संबंधित एअर बलूनवर पक्षाच्या चिन्हासह विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूरदेखील लिहिण्यात आला होता. यासंबंधीचे पह्टो आणि व्हिडीओही सुरवसे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.