2023 मध्ये एड्सने मरणाऱ्यांचे प्रमाण 79 टक्क्यांनी घटले असून एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण 44 टक्क्यांनी घटल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एड्स निर्मूलनाचे उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एड्स (प्रतिबंद आणि नियंत्रण) कायदा 2017 ची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत असल्यामुळे एड्सने मरणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे नड्डा यांनी
नमूद केले.
काय आहे 95-95-95 फॉर्म्युला
95 टक्के रुग्णांना माहीत आहे की, ते एचआयव्ही बाधित आहेत. 95 टक्के रुग्णांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत, तर 95 टक्के रुग्णांना अँटीव्हयरल थेरपी औषघांच्या माध्यमातून उपचार मिळणे हा फॉर्म्युला देशात अमलात आणल्यानंतर 2030 पर्यंत एड्स निर्मूलनाचे ध्येय गाठणे कठीण नसल्याचे नड्डांनी सांगितले.