
आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे (एआय) जाळे देशभरात विस्तारत आहे. चीनला या क्षेत्रात आपले महत्त्व प्रस्थापित करायचे आहे. यासाठी चीन विविध पावलं उचलत आहे. चीनने आता एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शालेय मुलांना एआयचे ट्रेनिंग दिले जाईल. राजधानी बीजिंगच्या शाळांमध्ये एआय शिक्षण सुरू होत आहे. 1 सप्टेंबरपासून मुलांना हे ट्रेनिंग दिले जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुले दरवर्षी कमीत कमी 8 तास एआयचे ट्रेनिंग घेतील.