एआय मॉडेल कमावते महिन्याला नऊ लाख!

सध्याच्या डिजिटल युगात आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’चा बोलबाला आहे. काही महिन्यांपूर्वी आपण एआय अँकरबद्दल ऐकलं होतं. त्यानंतर आता एआय मॉडेलची चर्चा रंगली आहे. ऐताना लोपेझ असे या मॉडेलचे नाव असून ती महिन्याला नऊ लाख रुपये कमावते.

ऐताना लोपेझ ही एआय फॅशन मॉडेल कॉम्प्युटरच्या मदतीने तयार करण्यात आलेय. ‘द क्लुलेस’ या स्पॅनिश कंपनीने एआय मॉडेल साकारलेय. अनेकदा मॉडेल उपलब्ध नसल्याने फॅशन शो रद्द करावा लागतो म्हणून एआय फॅशन मॉडेल तयार केले असे पंपनीचे मालक रुबेन क्रूझ यांनी सांगितले.

ऐताना लोपेझ हिचे वय 25 वर्षे आहे. तिचा स्वभाव मनमिळावू, मैत्रीपूर्ण, काळजी घेणारा आहे. सध्या ती स्पोर्टस् कंपनीची जाहिरात करते. याशिवाय तिचे फोटो फॅन व्ह्यू नावाच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करते. तिथे पैसे देऊन तिचे फोटो पाहता येतात.

द क्लुलेस या स्पॅनिश कंपनीशी आता अन्य कंपन्याही संपर्क साधत आहेत. या कंपन्यांना स्वतःसाठी एआय मॉडेल बनवायचे आहे.

ऐताना लोपेझचे इन्स्टाग्रामवर 3.43 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक सेलिब्रेटीदेखील तिला मेसेज करतात. ती खरीखुरी व्यक्ती नसून एआय मॉडेल आहे हे समजतही नाही.