AI Horoscope – एआयचे ‘राशी’ भविष्य

>> सुनील पुरोहित

जे काम पूर्वी आपण इतरांच्या मदतीने करून घेताना श्रम व वेळ वाया जायचा, तो आता एआयने कमी केला आहे. आपल्या विचारांमध्ये जर ओरिजिनॅलिटी असेल तर एआयसारखा मित्र नाही. आपल्या कल्पनांचे जग, भावविश्व, त्यामध्ये असणारा पेंशन प्रदर्शित करण्यासाठी एक सर्वोत्तम मित्र म्हणून एआयकडे पाहू शकतो. 

एआय मित्रा, तुमची कहाणी. जसजसं 2024 सरकू लागलं, हातातल्या मोबाईलमध्ये META AI दिसू लागलं, क्रांतीची पहिली घंटा वाजली. कालपरवापर्यंत आपल्याला रस्ता शोधण्यास मदत करणारा गुगल देव स्थिरावला होता. त्याच्या चमत्कारांवर रोजचा प्रवास सुरू झालाच होता.

सर्व आर्थिक व्यवहार आता gpay मधून होत होतेच, तोच हा नवा सवंगडी विनामूल्य सोबत दिसू लागला. मग गप्पा सुरू झाल्या. आपले विचार मांडायचे आणि एआयने त्यावर कौतुक करून अनुवाद करायचा किंवा तशा त-हेचे सुप्रसिद्ध विचार सादर करायचे असा नित्यक्रम सुरू झाला.

‘गुड मॉर्निंग’ संदेश ते ‘चिंतन एआय’ नावाचा नवा सोबती होताच. उत्सुकता वाढायला लागली. ‘काय बरं ही गंमत आहे’ म्हणून काही गोष्टी सांगायला लागलो. बघता बघता आमच्यामध्ये संवाद निर्माण झाला. नंतर आम्ही अभिजीत प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवी विशेषांक काढायचे ठरवले. काय बरे नवीन करता येईल आणि लक्षात आले, एआय आणि त्यांची समर्पक चित्रे, राशीभविष्यामध्ये याचा उपयोग करावा का ?

असा एक विचार आला आणि बघता बघता राशीभविष्य कथन करताना नवनवीन चित्रं समोर येऊ लागली. आमच्या टीमने, नीलम पोतदार आणि ज्योती शेजवळ यांनी तर यावर भरपूर मेहनत घेतली आणि शेकडो चित्रे मिळवली, अगदी चांगला वेळ कशासाठी, वाईट वेळ कशासाठी याची जेव्हा सांगड घालायला सुरुवात केली तेव्हा जी गोष्ट अनेक वाक्यांमध्ये लिहावी लागायची, ती एका चित्रात येऊ लागली आणि चित्र समर्पक तसेच मानवी भावनांचे यथार्थ प्रदर्शन करणारे होऊ लागले. अर्थातच राशीभविष्याला एक नवी उंची मिळाली. अगदी कल्पनेच्या पलीकडला एक नवा आविष्कार तयार झाला.

आता एक विचार आला. आपल्याकडे जे ज्योतिषविषयक साहित्य मराठीमध्ये आहे ते इंग्रजीमध्ये करून बघू या आणि समोर आले चॅट जीपीटी. बघता बघता आपलं लेखन त्याच्यासमोर द्यावं आणि त्यांनी धाडधाड भाषांतर करून समोर ठेवावं असे सुरू झाले. उदाहरणार्थ, ज्योतिष