कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची दिलगिरी, माध्यमांवर काढला राग

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते मुलांची लग्न लावतात असे विधान राज्याचे कृषीमंत्री यांनी केले होते. आता या विधानावरून कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तसेच माध्यमं जे दाखवायला नाही पाहिजे तेच दाखवतात असेही कोकाटे म्हणाले.

न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, ज्या शेतकऱ्याशी मी बोलत होते तो शेतकरी माझा मित्र होता. त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो. आम्ही बोलतना चेष्टा आणि मस्करी करत होते. हा संवाद पूर्णपणे व्यक्तिगत होता. या संवादाचा आणि शेतकऱ्यांचा संबंध नव्हता असे कोकाटे म्हणाले. तसेच बोलताना मी शेतकरी आणि कर्जाचा उल्लेख केला नाही आणि कुठेही कर्जमाफीचा उल्लेख केला नाही. कर्जमाफीचा विषय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. याबात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे म्हणत कोकाटे यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच मीडियाने ज्या गोष्टी दाखवायला नको त्या गोष्टी मीडिया जाणीवपूर्वक दाखवतात असेही कोकाटे म्हणाले.