निवडून गेलेल्या प्रतिनिधींनीच बनवलेले डिटेल्स लागू करा अशी मागणी करत मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी झाले. कमिटीद्वारे जे डिटेल बनवले आहेत तेच पूर्ण वर्षासाठी लागू होणार आहेत. सर्व गोष्टींसह विशेषतः डिटेल बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रशासन मान्यता असलेली निवडणूक होऊन चार प्रतिनिधी डिटेल्स बनवण्यासाठी पाठवले जातात आणि त्यांनी बनवलेल्या डिटेल्सनुसार मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर वर्षभर काम करतात असे असतानाही प्रशासनाने अचानक नोटिफिकेशनद्वारे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर यांना प्रशासनाने बनवलेल्या डिटेल्सनुसार काम करण्यास काही हरकत आहे का? अशा प्रकारचा फीडबॅक मागवला होता.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली आज रेल कामगार सेनेने आणि मोटरमन असोसिएशनने पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला. यावेळीही निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी बनवलेलेच डिटेल लागू करा अशी आग्रही भूमिका सेंट्रल रेल्वे मोटरमन असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला केली. प्रशासनाने काढलेल्या पत्रकाबद्दल मुंबई मंडळाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल, सीनियर डीओए पठाणी आणि डी ई भैरवा यांना धन्यवाद दिले. दरम्यान, आंदोलन यशस्वी करण्यात प्रशांत कमानकर, अमोघ निमसुरकर. तुकाराम कोरडे, महेंद्र म्हात्रे, निलेश पाटील, तिरुमलेश, संतोष शेलार, विकास पाटील, महेश मोकाशी, सचिन जोशी, मंगेश पाटील, शैलेश कांबळे, बीएफ शेख आणि अन्य संघटनांच्या पदाधिकाऱयांनी महत्वाचा वाटा निभावला.