खातेवाटपानंतर आता बंगल्यांच्या वाटपावरूनही महायुतीत नाराजीनाट्य; जाणून घ्या कोणाला कोणता बंगला…

राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. खातेवाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे दिसून आले होते. आता दालन आणि बंगल्याच्या वाटपावरूनही अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही मंत्र्यांना विसतारीत इमारतीत दालन दिल्याने नाराजी दिसून येत आहे.

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला देण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे.

महायुतीच्या 31 मंत्र्‍यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे. मंत्री गणेश नाईक यांना ब-4 पावनगड हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांना ब-३ जंजीरा बंगला देण्यात आला आहे. मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला देण्यात आला आहे. मंगलप्रभात लोढा यांना ब-5 विजयदुर्ग बंगला देण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला देण्यात आला आहे. मंत्री जयकुमार रावल यांना चित्रकुट बंगला देण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे.

जाणून घ्या कोणाला कोणाता बंगला मिळाला…