
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला होता. 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्यामुळे सर्व स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. या हल्ल्यामुळे गाझियाबादमधील एक मुस्लीम तरुणी सुद्धा हादरून गेली आणि तीने इस्लाम धर्मातून बाहेर पडत हिंदू धर्म स्वीकारला आहे. यावेळी प्रत्येक मुसलमान दहशतवादी वाटत असल्याचेही ती म्हणाली आहे.
नेहा खान असं या तरुणीचे नाव आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ती व्यथीत झाली होती. त्यामुळेच तिने धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू रक्षा दलाच्या मदतीने धार्मिक विधी आणि रितीरिवाज पूर्ण करत नेहाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्म परिवर्तन झाल्यानंतर नेहा खानने आपले नाव बदलून नेहा शर्मा असं केलं आहे. “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मला हादरून टाकलं आहे. ज्या प्रकारे हिंदुंना धर्म विचारून मारण्यात आलं, त्यामुळे मला जाणवू लागलं आहे की, मुस्लिम धर्म आता दहशतवादाचा पर्याय बनला आहे. प्रत्येक मुसलमान दहशतवादी वाटू लागला आहे. याच भावनिक धक्क्यामुळे मी सनातन धर्माचा स्वीकार करत आहे, असं नेहा म्हणाली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.