![mallikarjun kharge](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/01/mallikarjun-kharge-696x447.jpg)
महाविकास आघाडीचे सरकार येताच सोयाबीनची खरेदी प्रती क्विंटल 7,000 रुपयांनी करणार, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ” “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री यांसारखे भाजपचे मोठे नेते महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. मी कधीही पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात प्रचार करताना पाहिलेले नाही. साधारणपणे राज्याच्या निवडणुकांमध्ये राज्यातील नेते प्रचार करतात. ते काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत, पण महागाई, बेरोजगारी, गुंतवणूक यासारख्या मुद्द्यांवर ते कधीच बोलत नाहीत.”
महाविकास आघाडी शेतकऱ्यांना बोनस देऊन महाराष्ट्रात सोयाबीन खरेदी करेल, आणि दर क्विंटलला 7,000 रुपये दराने खरेदी करणार आहे. तसेच कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी करण्यासाठी एक समिती गठीत करणार, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.