
14 वर्षे नेदरलँड्सचे पंतप्रधान राहिल्यानंतर मार्क रुट यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान कार्यालय सोडले, ते पाहून जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान कार्यालयाला त्यांनी अलविदा केले.
निरोप समारंभ झाल्यावर ते एकटेच बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी सायकल घेतली व सायकल चालवत बाहेर पडले. त्यांच्या या कृतीवर खूश होऊन पंतप्रधान कार्यालयाच्या कर्मचाऱयांनी टाळ्या वाजवल्या.