दर वाढवूनही एसटी तोट्यात, 350 कोटी रुपयांची देणी बाकी

राज्य सरकारने एसटीच्या दरात वाढ केली होती. त्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती बिकटच आहे. एसटीकडे 350 कोटी रुपयांची देणी थकली असून कर्मचाऱ्यांचे PF ची रक्कम कापूनही ती भरलेली नाही.

एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारने एसटीच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ केली होती. ही वाढ केल्यानंतरही एसटीची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडं फंड आणि इन्शुरन्स चे हफ्ते कापूनही ही रक्कम भरलेली नाही. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि डिझेलची खरेदीची बिलं थकलेली आहेत. खासगी बसचे दर कमी असल्याने एसटीच्या प्रवाशांची संख्या लाखांनी कमी झाली आहे.