ओडिशातील सिमिलिपाल आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या झीनत वाघिणीला अखेर 21 दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये पकडण्यात यश आले. 8 डिसेंबरपासून ओडिशातील सिमिलिपाल आणि परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण करणारी झीनत दिवस-रात्र तीन राज्यांमधून फिरत होती. वन विभागाने विविध ठिकाणी कॅमेरा ट्रप आणि पिंजरे लावून तिला पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नव्हता.
मूळची ताडोबाची
ओडिशा आणि पश्चिम बंगाल वन विभागातील 250 हून अधिक अधिकारी झीनत वाघिणीला पकडण्याच्या कामात होते. मानवी वस्तीत तिने शिरू नये यादृष्टीने खबरदारी घेण्यात येत होती. 20 डिसेंबरपासून बंगालमध्ये 200 पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले होते. महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यातून झीनत वाघीण सिमिलिपालला आली होती.