हिंदुस्थानमध्ये या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी माहिती हिंदुस्थान अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. या स्पर्धेत हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासह जगभरातील अव्वल दहा खेळाडूंचा समावेश असेल. आदिल सुमारीवाला म्हणाले, 2027 मध्ये होणारी जागतिक रिले स्पर्धा आणि 2029 मधील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी हिंदुस्थान उत्सुक आहे. शिवाय 2028 मधील जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठीहीदेखील ‘एएफआय’ने गतवर्षी नोव्हेंबरमध्येच जागतिक अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबेस्टियन यांच्याकडे मागणी केलेली आहे.