तालिबानचा महिलांसाठी आणखी एक फर्मान, आता महिलांच्या नर्सिंगच्या शिक्षणावर बंदी?

अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यापासून महिलांवर निर्बंध लादण्यासाठी वेगवेगळे फर्मान सातत्याने काढले जात आहेत. अशातच आता आणखी नवा फर्मान काढण्यात आला आहे. अफगाणी महिला यापुढे मिडवायफरी (सुईण) आणि नर्सिंगचे शिक्षण घेणार नाहीत. बीबीसीच्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये महिलांना शिक्षणाचे दोन मार्ग होते मात्र त्यावरही तालिबान सरकारने गदा आणली आहे.

एकाबाजूला अफगाणिस्तानमध्ये आरोग्याचे संकट गंभीर आहे. संयुक्त राष्ट्राने 2023 मध्ये अफगाणिस्तानला देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 18 हजार सुईणींची गरज असल्याचे म्हटले होते. तर सुईणीचे काम आणि नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी सांगितले की, त्यांना सकाळी वर्गात न जाण्याचा आदेश देण्यात आला होता. याबाबत अफगाणिस्तानच्या संस्थेने पुष्टी केली आहेमात्र अजूनपर्यंत यावर तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तालिबानने त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत संस्था बंद ठेवण्याच्या सूचना तालिबानने दिल्याचे संस्थांचे म्हणणे आहे. तालिबानने अभ्यासक्रम इस्लामिक असल्याची खात्री केल्यानंतर त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देऊनही, किशोरवयीन मुलींना 2021 पासून शिक्षण मिळू शकले नाही.