अफगाणिस्तानात महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणास मनाई

अफगाणिस्तानात 2021 मध्ये तालिबानी सत्ता आल्यापासून महिलांवर अनेक गोष्टींसाठी निर्बंध लादणारे नवनवीन फतवे काढले जात आहेत. आता अफगाणी महिलांना एकमेकांचा आवाज ऐकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांना मोठय़ाने कुराण पठण करण्यास किंवा इतर महिलांसमोर कुराण पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महिलांवरच निर्बंध का?

महिलेचा आवाज हा औराह आहे. याचा अर्थ तो लपवून ठेवला पाहिजे, तो कुणीही ऐकू नये, असे तालिबानचे मंत्री खालिद हनाफी यांनी म्हटले आहे.

हिजाब पुन्हा अनिवार्य झाल्यानंतर अफगाण महिलांचे जीवन सुधारले असा दावा अखुंदजादा यांचा आहे.

असे आहेत नियम

z स्त्रीने सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण शरीर झाकून ठेवणे बंधनकारक. चेहराही झाकलेला हवा. कपडे पातळ, घट्ट किंवा लहान नसावेत.

z महिलांना परपुरुषांकडे पाहणेदेखील निषिद्ध असून  एकटे जगण्यावर, प्रवास करण्यावरही निर्बंध आहेत.

z सहाव्या इयत्तेनंतर शाळेस जाण्यास मनाई आहे. गाणे गाण्यावर बंदी

z  कायदा मोडणाऱ्या महिलांना सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचण्याची शिक्षा देण्यात येईल, असे तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी म्हटले आहे.