बेलगाम राजकीय ताकद ‘कुंचला’ मोडू पाहतेय; सत्य आणि योग्य व्यंगचित्रांना का म्हणून नोटीस बजावली?आदित्य ठाकरे यांचा संताप

व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांची व्यंगचित्रे सत्य आणि योग्य असताना त्यांना मुंबई लॉ एन्फोसमेंट एजन्सीने का म्हणून नोटीस बजावली, असा संताप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या व्यंगचित्रात चूक तरी काय आहे, असा सवालही त्यांनी मुंबई पोलिसांना केला आहे. तर नोटीसनंतर ‘बेलगाम राजकीय ताकद ‘पुंचला’ मोडू पाहतेय,’ अशी प्रतिक्रिया आचार्य यांनी व्यक्त केली आहे.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही राजकीय व्यंगचित्रांबाबत मुंबई लॉ एन्पर्ह्समेंट एजन्सीने आक्षेप घेत आचार्य यांना नोटीस बजावली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर संताप व्यक्त केला आहे. नोटीसबाबत आचार्य यांनीही एजन्सीला टोला लगावताना म्हटले आहे की, हे जाणून खूप आनंद झाला की, मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था शांत आहे.

व्यंगचित्रांचा त्रास नेमका कुणाला?

एलॉन मस्क यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी ‘एक्स’ हे ट्विटर हॅण्डल ताब्यात घेतले. यामुळे कुणाच्याही गोपनीयता, स्वातंत्र्य, अधिकारांना पायदळी तुडवत नाही. मात्र सध्या परिस्थिती वेगळीच आहे. या व्यंगचित्रांमुळे नेमका कुणाला त्रास झाला की ज्यामुळे पोलिसांनी आचार्य यांना नोटीस बजावली. या व्यंगचित्रांमध्ये काही खोटे, कुणाचा अपमान करणारे असे काही नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.