मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, आदित्य ठाकरे यांनी साधला रक्तदात्यांशी संवाद

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाने गोरेगावच्या मीनाताई ठाकरे ब्लड सेंटरच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. आदित्य ठाकरे यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला. शिबिरात 462 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

विमानतळावरील डोमेस्टिक एअरपोर्ट, टर्मिनल 1, एमएलसीपी येथील भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाजवळ हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. एक रक्तदाता तीन जीव वाचवतो. रक्तदान केलेल्या एका रक्ताच्या पिशवीमधून रुग्णांसाठी तीन वेगवेगळे घटक बाजूला करून उपचार केले जातात. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक लोकांना जीवनदान दिले. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी रक्तदात्यांचे काwतुक केले व आभार मानले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेना सरचिटणीस आमदार सचिन अहिर, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, शिवसेना व युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, मुंबई विमानतळ (एमआयएएल) प्रशासनाचे अधिकारी देवेश श्रीवास्तव, रोहित झगडे, हॉटेल ताज सांताक्रुझचे जनरल मॅनेजर विकास परिमो व एचआर डायरेक्टर ब्लेस डिसोझा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. शिबिराला भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, दिलीप भट, सरचिटणीस मिलिंद तावडे, विजय शिर्पे, संजीव राऊत, नीलेश ठाणगे, दिनेश पाटील, विजय तावडे, दिनेश परब आदी उपस्थित होते.