इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेले आदित्य एल-1 अंतराळयान आज 15 लाख किमीचा प्रवास करून अंतराळाच्या सन अर्थ लॅग्रेंज पॉइंट-1 वर पोहोचले आहे. यासाठी या यानाला 126 दिवस लागले आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच बिंदू आहेत. जेथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल संतुलित आहे. या ठिकाणी कोणतीही वस्तू ठेवल्यास ती त्या बिंदूभोवती सहज फिरू लागते. पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये 1.5 दशलक्ष किमी अंतरावर आहे. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही. आदित्य एल-1 यानाचे प्रक्षेपण 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून पीएसएलव्ही-सी 57 च्या एक्सएल आवृत्ती रॉकेटचा वापर करून प्रक्षेपण करण्यात आले होते.