अदिती तटकरे यांनी तळा तालुक्याचा विकास रोखला, तळा विकास आघाडीचा आरोप

मंत्री असूनही अदिती तटकरे यांना तळा तालुक्याचा विकास करता आला नाही. अडीच वर्षांपासून बंद असलेले तळा ग्रामीण रुग्णालय तळा विकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले. मात्र अदिती तटकरे आता फुकटचे श्रेय घेत आहे. तटकरे यांनी तालुक्याचा विकास रोखला असल्याचा आरोप विकास आघाडीने केला आहे.

तळा येथील ग्रामीण रुग्णालय अडीच वर्षांपासून बंद होते. ग्रामीण रुग्णालय सुरू करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा तळा विकास आघाडीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांना दिला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी आणि तळा विकास आघाडीचा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे रुग्णालय सुरू आरोप केले. मात्र त्यानंतर 12 सप्टेबर रोजी मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे हे रुग्णालय सुरू झाल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा विकास आघाडीने खोडून काढला आहे.

श्रेय जरूर घ्या, पण रुग्णालय सुरू करण्यासाठी अडीच वर्षे का लागली याचेही उत्तर तटकरे यांनी द्यावे, असे आव्हान तळा विकास आघाडीचे विराज टिळक आणि रामदास तळकर यांनी दिले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना शासन यंत्रणा बरोबर असताना जनतेला वेठीस धरून तटकरे यांनी तळा तालुका वाऱ्यावर सोडला, असा आरोपही त्यांनी केला आहे.