विकसित भारत हेच आमचे ध्येय -राष्ट्रपती, संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

भारतीय प्रजासत्ताकाने 75 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. दोन महिन्यांपूर्वीच आपण संविधान स्वीकारल्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला. हा प्रसंग लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या वैभवाला नवीन उंची देईल. विकसित भारत हेच आमच ध्येय्य आहे, असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा अभिभाषणातून मांडला. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाकुंभात झालेल्या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही श्रद्धांजली अर्पण केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, आज, प्रत्येकजण देशाच्या विकासाला पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच आपण देशाच्या पूर्ण क्षमतेचा अनुभव घेत आहोत. दलित, वंचित आणि आदिवासी समुदायांना त्याचे फायदे मिळत आहेत. दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाच्या कल्याणाला आम्ही प्राधान्य दिले. तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना नवीन घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाषण करता करता थकल्या बिचाऱ्या राष्ट्रपती सोनिया गांधी यांची टीका 

भाषण करता करता थकल्या बिचाऱ्या राष्ट्रपती. राष्ट्रपती यांची भाषण करताना चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. हे फारच वाईट, असे म्हणत कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणावर टीका केली. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या प्रतिक्रियेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी होकार दिला. राष्ट्रपतींनी भाषणात तेच तेच मुद्दे सांगितले. त्यांचे भाषण खूपच कंटाळवाणं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, टीका करणाऱ्यांना हिंदी समजल नसावं, असे स्पष्टीकरण राष्ट्रपती कार्यालयाने दिले आहे.