आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे नाना चौक ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर उपस्थित होते. तसेच यावेळी गांधी स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली.