‘अदानीं’ना हवेत चिनी अभियंते; ’मेड इन इंडिया’ नव्हे, ’मेड इन चायना’साठी आग्रह

केंद्रातील आताचे एनडीए सरकार आणि त्याआधीचे मोदी सरकारने मेड इन इंडियाचा मोठा गाजावाजा केला. परंतु, देशातील अदानी समूहाला सोलर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीसाठी चीनमधील अभियंते हवे आहेत. चीनमधील 30 अभियंत्यांना आणण्यासाठी अदानी समूहाने केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. कंपनीने कागदपत्रांमध्ये 8 परदेशी भागीदारांचा उल्लेख केला आहे. हे सर्व जण चीनमधील आहेत. ते उपकरण उत्पादक आणि पुरवठा साखळी विक्रेते आहेत.

2021-22 या आर्थिक वर्षात 591 कोटी रुपयांची आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 180 कोटी रुपयांची चीनी उपकरणे सुद्धा आयात केली आहेत. अदानी सोलरच्या सौर उत्पादन युनिटने 2027 पर्यंत 10 जीडब्ल्यू सौर उत्पादन क्षमता तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा कारखाना गुजरातमधील कच्छ येथे आहे. यासाठी  25,114 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे कंपनीने सरकारला दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. अदानी सोलरने सौर उत्पादन युनिटमध्ये 15 चिनी नागरिकांसाठी व्हिसा मागितला होता. मार्चमध्ये आणखी 13 चिनी नागरिकांसाठी व्हिसाची विनंती केली आहे. हे अभियंत्ये अदानी सोलरच्या चिनी सौर पुरवठा साखळी विक्रेत्यांसोबत काम करत आहेत.

हिंदुस्थानात पहिल्यांदाच सौर उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. प्लांट उभारण्यासाठी, चाचणी करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता आहे. सौर यूनिट्सची स्थापना करण्याचे कौशल्या हिंदुस्थानकडे नाही, त्यामुळे चीनमधील अभियंत्यांना बोलावत आहोत, असे अदानी समूहाने म्हटले आहे.