SEBI च्या नोटीसीनंतर अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण अधिक चिघळणार! काँग्रेसच्या नेत्यानं ट्विट करत व्यक्त केलं मत

praveen-chakravarty

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस दिल्याने अदानी प्रकरण अधिकच चिघळले असल्याचं मत प्रोफेशनल्स काँग्रेस आणि डेटा विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी व्यक्त केलं आहे. या निमित्तानं हिंडेनबर्गने उपस्थित केलेले प्रश्न त्यांनी सोशल मीडिया हँडलवरून विचारले आहेत.

आपल्या अधिकृत X हँडलवर प्रवीण चक्रवर्ती म्हणतात, सेबीने (SEBI) हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस दिल्याने अदानी प्रकरण अधिकच चिघळले आहे. हिंडेनबर्गने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 1: सेबीच्या अध्यक्षा बुच यांनी 2022 मध्ये गौतम अदानी यांची त्यांच्या अहवालापूर्वी दोनदा भेट का घेतली? 2: सेबीने उदय कोटकचे नाव का दिले नाही ज्यांच्या फर्मचा अदानी स्टॉक कमी करण्यासाठी वापरला जात होता? 3: हिंडनबर्गने केवळ $4.1 दशलक्ष कमावले असताना सेबीने शेकडो दशलक्ष नफा कमावल्याच्या खोट्या बातम्या मीडियाला का दिल्या? 4: 40+ मीडिया स्टोरीजवर सेबी गप्प का आहे? यामध्ये फिनान्शिअल टाइम्सने हिंडेनबर्गच्या निष्कर्षांचे पुष्टीकरण केल्याच्या वृत्ताचाही समावेश आहे.

दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटलं आहे की, ‘हिंदुस्थानच्या नियमांच्या संशयास्पद उल्लंघनाचा’ ठपका ठेवत 27 जून रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून ‘कारणे दाखवा’ नोटीस मिळाली आहे.

अदानी प्रकरण: हिंडेनबर्गला SEBI कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली; कंपनी देखील लढण्याच्या तयारीत, ब्लॉगमधून केला प्रतिहल्ला