>>संदेश सावंत
लाडक्या कंत्राटदारांना पोसणाऱ्या मिंधे सरकारकडून राज्यात ‘लाडका उद्योगपती’ योजना जोरात सुरू आहे. विमानतळ विकास, धारावी पुनर्विकास, हजारो कोटींचे वीज खरेदी कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आले. हे कमी म्हणून की काय, आता महायुतीच्या सरकारने चंद्रपूरमधील एक शाळाच अदानीला आंदण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या आशीर्वादाने अदानी उद्योग समूहाची सर्वच क्षेत्रात हळूहळू घुसखोरी सुरू आहे. अदानी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपूर येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्याची शाळा या फाउंडेशनने चालवायला घेतली आहे. शालेय शिक्षण विभागाने पुढील कंधरा दिवसांत सदर शाळेचे व्यवस्थापन बदलण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.
शिक्षण विभागाचे आदेश काय?
z कार्मेल एज्युकेशन सोसायटी, घुग्घुस, जि. चंद्रपूर संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा (इंग्रजी माध्यम इ. 1 ली ते 12 वी) अदानी फाउंडेशन, अहमदाबाद या संस्थेस हस्तांतरीत करण्यात यावी.
z शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही. शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील असल्याने त्या ठिकाणी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी व्यवस्थापन स्वीकारणाऱ्या संस्थेवर राहील.
z विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी सर्व बाबी तपासून व आवश्यक अटींचा समावेश करून, शाळेचे व्यवस्थापन बदलाबाबत पुढील 15 दिवसांत कार्यवाही करावी.