मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले आहेत. 21 जानेवारी रोजी अंबर व शिवानी यांनी या जोडीचे शाही थाटात लग्न पार पडले. पुण्यातील एका फॉर्म हाऊसवर यांचे लग्न पार पडले.
View this post on Instagram
लग्नात शिवानीने हिरव्या रंगाची नव्वारी पैठणी नेसली होती. केसात पिवळा चाफा, नाकात नथ, हातात हिरवा चूडा आणि हिरवी पैठणी यात शिवानी अतिशय सुंदर दिसत होती. तर अंबरने हलक्या क्रीम रंगाचा कुर्ता व हिरवं धोतर घातलं होतं.
अंबर व शिवानी यांचा गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर साखरपुडा झाला होता. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.