तुझे सगळे कपडे काढ आणि… अभिनेत्रीने साजिद खानवर लावले गंभीर आरोप

बॉलिवूडमधील दिग्दर्शक साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. नवीना बोले असे त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने साजिद खानवप कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. ‘ने मला घरी बोलवलं आणि कपडे उतरवण्यास सांगितलं होतं” असं नविनाने एका मुलाखतीत सांगितले आहे.

नवीनाने सुभोजित घोष यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. ”साजिद खानसोबतचा अनुभव माझ्या आयुष्यातला भयंकर अनुभव होता. बेबी चित्रपटासाठी मी अत्यंत उत्साहात त्याला भेटायला गेले होते. त्याने मला त्या्चाय घरी बोलावले. मी पोहोचले तेव्हा त्याने मला ‘जा तुझे सगळे कपडे काढ आणि अंतर्वस्त्रांमध्ये इथे येऊन बस. मला बघायचं आहे की तू किती कम्फर्टेबल आहेस? तो प्रसंग आठवून मला आजही अंगावर काटा येतो’, असे नवीनाने सांगितले.

त्यानंतर मील त्याने सांगितलेली गोष्ट करायला नकार दिला. त्यावर त्याने काय प्रॉब्लेम आहे असे मला विचारले. त्यावर मी त्याला चित्रपटात बिकीनी घालायची असेल तर मी घालेन पण इथे तुझ्या घरी मी कपडे काढणार नाही. मी कशीबशी तिथून निघाले. त्यानंतर त्याने मला 50 वेळा फोन केला”, असेही नवीनाने सांगितले.