बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या दोघांच्याही प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे गणित बिघडले आहे. हे दोघेही आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या ब्रेकअप बाबत अद्याप त्यांनी स्वत:हून भाष्य केलेले नाही. एकीकडे सातत्याने ब्रेकअपच्या बातम्या फिरत असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी तिच्यासोबत मिस्ट्रीमॅन दिसल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मलायका अरोरा सध्या स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोमध्ये मलायकाने निऑन कलरची बिकिनी घालून सफेद गॉगलवर सुंदर पोझ दिली आहे. तर दुसऱ्या फोटोत तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिसत आहे. एका फोटोमध्ये स्पेनची एक फेमस डिश दिसत आहे. तर चौथ्या फोटोमध्ये व्हाईट कलरचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती दिसत आहे. हा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यामुळे मलायका पुन्हा एकदा मलायका प्रेमात पडली की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र मलायकाचा मिस्ट्रीमॅन नक्की कोण आहे? याबाबात अद्याप कोणतीही माहिती नाही.
मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा काही वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या. अर्जुन कपूरने मागील महिन्यात त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला. यावेळीही मलायका त्याच्यासोबत दिसली नाही.