मुंबईत भरमसाट वीज बिल पाहून सर्वसामान्यांना धक्का बसणे यात नवीन काही राहिले नाही. परंतु आता भरमसाट विजेचा शॉक सेलिब्रिटी व्यक्तींनाही बसू लागला आहे. अभिनेत्री काजोलने नुकताच वाढीव वीज बिलाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या संतापाची पोस्ट तिनं इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून ठेवली आहे. मला माझ्या घराच्या विजेचे बिल मिळाले आहे. पण मला असे वाटते की, हे बिल त्यांनी मला सूर्यप्रकाशासाठी, मोठ्या लाईट्ससाठी आणि बोगद्याच्या शेवटी असलेल्या प्रकाशासाठी दिले आहे असे वाटतेय, असे काजोलने म्हटले आहे. काजोल आपला नवरा अजय देवगण आणि मुलांसोबत जुहू येथील एका आलिशान बंगल्यात राहते.