लेन्स लावल्यामुळे अभिनेत्रीच्या डोळय़ांना गंभीर दुखापत

लेन्समुळे अभिनेत्री जस्मीन भसीन सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असून तिला लेन्स लावल्यामुळे दिसणेही बंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जस्मिन 17 जुलैला एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. मेकअप करत असताना तीने लेन्स लावले. ते लेन्स घातल्याबरोबर तीच्या डोळ्यात प्रचंड जळजळ व्हायला लागली. मात्र, तीने आधी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मग डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

लेन्स घातल्यामुळे डोळे खूप दुखू लागले आणि काही वेळाने मला दिसणेच बंद झाले, असे जस्मिन म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मी डॉक्टरांकडे जायचे ठरवले. डॉक्टरांनी डोळ्यांचा कॉर्निया खराब झाल्याचे सांगितले. यानंतर डोळय़ांवर पट्टी लावण्यात आली.