अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक रियालिटी शो आणि चित्रपटांमधून स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री अमृचा सध्या झी मराठी वरील ड्रामा जुनियर्स या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोसाठी अमृताने खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे.
तसेच बोल्ड मेकअप केला असून केसांचा बन बांधून तिने हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.
या ड्रेसमध्ये अमृताने कमालीच्या पोझही दिल्या आहेत.
अमृताचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अमृताने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून या फोटोंना ‘How Much Pink Is Enough Pink?’ असे कॅप्शन दिले आहे.