लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘फितूर’ थिएटर सोसायटीच्या कलाकारांनी ‘योग आणि युवा-तन, मन, काया’ हे नुक्कड नाटक सादर केले. आजच्या तरुण पिढीला, ज्यांना अतिशय कमी वयातच शारीरिक वेदना जाणवतात त्यांच्यात या नाटकाद्वारे जागरूकता करण्यात आली. हे नुक्कड नाटक कॉलेज पॅम्पस, आझाद मैदान आणि अंधेरी येथील स्नेहसदन एनजीओमध्ये झेवियर्स योग समितीच्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत सादर करण्यात आले. ‘हे नाटक पिढय़ांमधील अंतर कमी करण्याचे आणि आजच्या जागतिक समस्यांवर योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे उद्दिष्ट ठेवते,’ असे ‘फितूर’ थिएटर सोसायटीच्या प्रमुख आर्या मिरजणकर म्हणाल्या.