![chhava](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chhava-696x447.jpg)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपट (Chhaava) 14 फेब्रुवारीला देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे. या चित्रपटातील विकीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अगांवर अक्षरश: काटा आणला. शुक्रवारी सगळ्या चित्रपटगृह ‘नम: पार्वतीपतये हर हर महादेव’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ या घोषणांचा आवाज घुमला. ‘छावा’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच खूप चर्चा रंगली होती. ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली
अभिनेता विकी कौशलने अभिनय क्षेत्रात आल्यापासूनच आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. विकी कौशलने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत 2010 मध्ये ‘गँग्स ऑफ़ वासेपूर’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटात नीरज घायवान यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यामध्ये नीरज घायवान हे देखील चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होते. या काळात कौशल आणि नीरज यांची मैत्री झाली. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट पूर्ण झाल्यानंतर, नीरजने ‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा विचार केला, ज्यासाठी त्याने विकीला ऑडिशनसाठी बोलावले. तेव्हा पासून खऱ्या अर्थाने विकीच्या करिअरला सुरूवात झाली.
मसान – ‘ये दुख काहे खत्म नहीं होता बें’
विकी कौशल 2015 साली ‘मसान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. त्याने या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यात त्याने एका बनारसी मुलाची भूमिका साकारली होती. ‘मसान’ साठी विकीला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्सअंतर्गत सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राझी – वतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं
2018 साली 1971 च्या भारत – पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असणारा राझी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ चित्रपटात विकी आलिया भट्टसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटानेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. दरम्यान ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा 2018 वर्षातील हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला.
उरी द सर्जिकल स्ट्राईक- How’s the josh
अभिनेता विकी कौशल याचा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा सिनेमा बनवण्यात आला आहे.या चित्रपटातील How’s the josh हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
‘सॅम बहादूर’ –
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ बायोपिक 2023 ला प्रदर्शित झाला. यात विकी कौशलने हिंदुस्थानच्या माजी लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. सॅम बहादूर या चित्रपटातील विकीची देहबोली, संवादफेक आणि फील्ड मार्शलच्या भूमिकेतील त्याचा अंदाज पाहून प्रेक्षकांनी विकीचे कौतुक केलं. या चित्रपटानेदेखील रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली.
छावा – ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’
फाड देंगे मुघल सलतनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुररत की, हम शोर नहीं सिधा शिकार करते है’ अशा दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शनसह स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजीराजेंचा जीवनपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विकी कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील विकीच्या अभिनयाने प्रेक्षकांच मन जिंकलं. विकीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत, पण त्याची ही व्यक्तिरेखा कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील.