
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने इंडस्ट्रीत 12 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्याने काही दिवसांपूर्वी ऑडीशनच्या दिवसांमधील एक फोटोही शेअर केला होता. नुकतेच त्याने आगामी सिनेमा ‘बॅड न्यूज’च्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा त्याला 15 सेकंदाची जाहिरात देखील मिळत नव्हती आणि आज तो टॉप कलाकारांपैकी एक आहे.
विकी कौशल म्हणाला की, ”आज जे काही मी आहे ते सर्व चमत्कारीक वाटते. असे वाटते की, मी एका स्वप्नात जगत आहे आणि मी जागा होऊ इच्छित नाही. प्रत्यक्षात वाटते की, ज्यावेळी मी इंडस्ट्रीत सुरुवात केली होती आणि मी जे ऑडिशनचे फोटो टाकले होते. मला फक्त एक संधी हवी होती. नक्की, प्रत्येक जण सिनेमात महत्वाची भूमिका आणि अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहतात”.
विकी कौशल पुढे म्हणाला, जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यावेळी एक जाहीरात मिळण्याचाही वेगळा आनंद असायचा. पुढे म्हणाला, एक वेळ होती ज्यावेळी मला 15 सेकंदाची जाहीरातही मिळत नव्हती आणि मी विचार करायचो मला एखादी जाहीरात मिळाली तर मी पार्टी करेन. तिथून आजपर्यंत 12 वर्षात मला कुणी सांगितलं असतं की तू अशा चित्रपट निर्मात्यांसोबत काम करशील आणि या चित्रपटांना प्रेम मिळेल. म्हणून मी हसतो, मला वाटते की जर मला त्यातले 10 टक्केही मिळाले तर ते माझ्यासाठी पुरेसे असेल. अशा चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे आणि मला विश्वास आहे की, देवाने आपल्या सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी लिहिल्या आहेत आणि माझा विश्वास आहे की ही फक्त सुरुवात आहे.