अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात, मुंबई-नागपूर महामार्गावर घडली घटना

अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीच्या कारला नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात सोनाली जखमी झाली असून तिच्यावर नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

बहिण आणि भाच्यासोबत सोनाली सोमवारी रात्री नागपूरला चालली होती. सोनालीचा भाचा गाडी चालवत होता. यावेळी नागपूर महामार्गावर सोनालीची कार एका ट्रकवर आदळली. या अपघातात सोनाली आणि तिचा भाचा दोघे जखमी झाले आहेत. तर सोनालीची बहिण किरकोळ जखमी झाली.

सोनाली आणि तिच्या भाच्याला उपचारासाठी नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही पुढील 48-72 तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.