
सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेली प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचे सावत्र वडील डीजीपी रामचंद्र राव यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रान्या राव हिच्या वडिलांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. शनिवार संध्याकाळी कर्नाटकच्या गृहमंत्रालयाने त्यांच्या रजेचा आदेश दिला.
रान्या राव हिला 6 मार्च रोजी बंगळुरू विमानतळावर 14 किलो सोन्याची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. त्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 4.73 कोटी रुपये इतकी आहे. रान्या ही दर 15 दिवसांनी दुबईला जात असायची. रान्या वर्षभरात जवळपास 30 वेळा दुबईला गेली होती. एका दौऱ्यात ती 13 लाख रुपये कमवत असायची. तस्करी करण्यासाठी ती मोडिफाईड जॅकेटचा वापर करायची. तसेच बेल्टमधूनही सोने तस्करी करायची.