तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 30 सप्टेंबर रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली होती. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी रात्री रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.