अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. आता या प्रकरणी सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.
महिन्याभरापूर्वी राहुल सोलापुरकर यांनी एका पॉडकस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेवरून विधान केले होते. या विधानावरून राज्यात एकच गदारोळ निर्माण झाला होता. सोलापूरकर यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता सोलापूरकर यांनी एक व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे.