हमको यहाँ आना है, आतंक को हराना है; अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगामला

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या मंगळवारी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर हजारो पर्यटकांनी त्यांच्या जम्मू कश्मीरच्या टूर रद्द केल्या आहेत. जे पर्यटक कश्मीरमध्ये होते ते देखील तिथून निघाले. जम्मू कश्मीरची अर्थव्यवस्था ही 90 टक्के पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटकच नसल्यामुळे कश्मीरचे पर्यटन पूर्णपणे ढेपाळले आहे.

अशात प्रसिद्ध मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी हा आज जम्मू कश्मीरला गेला आहे. अतुल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे. ”आपल्याला आंतकवादाला हरवायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे यायलाच लागेल. चला कश्मीरला जाऊ’, असे त्याने एका फोटोसोबत शेअर केले आहे. हा फोटो श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटचा असून ती फ्लाईट पूर्णपणे रिकामी आहे. या व्यतिरिक्त अतुलने जम्मू कश्मीरमधील लोकांसोबत संवाद साधातानाचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच तो पहलगामलाही गेला असून त्याने तिथला फोटोही शेअर केला आहे.