
अभिनेता सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंह ने मुंबईतील जुहू येथे एक लक्झरी फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटची किंमत 18 कोटी रुपये आहे. अमृता सिंहने गेल्या वर्षी मुलगी सारा सोबत जवळपास 22 कोटी रुपये किंमतीचे दोन कार्यालय खरेदी केले होते. त्याआधी 9 कोटी रुपयांचे एक ऑफिस खरेदी केले होते. अमृता सिंहने फेब्रुवारीत हे फ्लॅट खरेदी केले आहे. या फ्लॅटचा बिल्ट अप एरिया 2712,9 स्क्वायर फूट आहे. तसेच तीन कारची पार्किंग स्पेस आहे. या फ्लॅटसाठी 90 लाख रुपयांची स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे.