अल्लू अर्जुनची 18 तासांनंतर सुटका, जामीन मिळूनही तुरुंगात काढली रात्र

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अटकेत असलेल्या अल्लू अर्जुनची तब्बल 18 तासांनंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. शनिवारी सकाळी 9 वाजता तुरुंगातून घरी पोहोचताच अल्लूने कुटुंबियांना कडकडून मिठी मारली. शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अल्लूला तुरुंगात रात्र काढावी लागली.