एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई; 20 लाखांची मालमत्ता मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना 11 सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” क्र. IND-MH-4-MM-3731, आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” क्र. IND-MH-4-MM-998 या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. दोन्ही नौकांसह 20 लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली.
गस्ती दरम्यान 11 सागरी मैलाचे दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या 2 नौका अनुक्रमे अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” क्र. IND-MH-4-MM-3731, आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” क्र. IND-MH-4-MM-998 या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. या दोन्ही नौका मंगळवारी सकाळी मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या असून सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट व जनरेटर नौकेसहीत जप्त करण्यात आले असून दोन्ही नौकेवरील एल.ई.डी. लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी रु. 10 लाख किंमत धरुन दोन नौकेवरील एकूण रु. 20 लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.