1 डिसेंबरपासून हिंदुस्थानात मेसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्यात आला आहे. या नियमांतर्गत कुठल्याही मेसेजचा मूळ स्रोत शोधता येणार आहे. त्यामुळे बनावट मेसेज आणि ऑनलाइन फसवणुकीला चाप बसणार आहे. या नियमामुळे नेट बँकिंग किंवा ओटीपी मेसेज मिळण्यास उशीर होणार नाही. या नियमामुळे मेसेज आणि इतर मेसेज यांची ओळख पटवता येणार आहे.
बनावट कॉल आणि मेसेजपासून दिलासा मिळण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलत आहे. ‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून मेसेट ट्रेसिबिलीटीचा नियम लागू करण्यात येत आहे. हा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. या नियमांतर्गत बनावट किंवा फसवणुकीचे कॉल करणाऱयाचा शोध घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे मोबाइल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार असून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
‘ट्राय’ने लागू केलेल्या नियमांतर्गत बँकिंग मेसेज आणि प्रमोशनल टेलिमार्केटिंग मेसेज वेगवेगळे ठेवले जातील. तसेच संशयित प्रमोशनल मेसेजबाबत अलर्टदेखील जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाइल युजर्स सतर्क राहतील आणि फसवणूक होणार नाही.