गोवंडीच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरात क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करणाऱया एका बोगस डॉक्टर महिलेवर गुन्हे शाखेने कारवाई केली. या महिलेकडे महाराष्ट्र मेडिकल काैन्सिल यांच्याकडील कोणताही परवाना व नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरातील थोरात मार्गावर जामराह क्लिनिक असून तेथे एक महिला डॉक्टर रुग्णांवर उपचार करते. पण त्या महिलेकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसून ती बोगस डॉक्टर असल्याची माहिती गुन्हे शाखा युनीट-6ला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने महापालिकेच्या एम. पूर्व विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सरस्वती पाटील यांच्यासह त्या क्लिनिकवर धडक दिली. तेव्हा तेथे गुलफशा सोहेल शेख (30) ही महिला रुग्णांवर उपचार करताना आढळून आली. तेव्हा डॉ. पाटील यांनी गुलफशा हिच्याकडे महाराष्ट्र मेडिकल काwन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर वैद्यकीय परवान्यांबाबत विचारणा केली असता तिच्याकडे कोणताही परवाना व नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे गुलफशा शेख हिच्यावर कारवाई करण्यात आली.