‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू

1998 साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका आजही चांगली तुफान गाजतेय. मालिकेच जुने भागदेखील प्रेक्षक आवडीने बघतात. सध्या ‘सीआयडी’चे दुसरे पर्व सुरू आहे. मालिकेतील आता मुख्य पात्र एसपी प्रद्युम्नचा मृत्यू दाखवला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एसपी प्रद्युमन साकारणारे शिवाजी साटम यांची एक्झिट होणार आहे. अशातच त्यांची जागा आता अभिनेता पार्थ समथान घेणार असल्याचे समजते. पार्थ पाच वर्षांनी हिंदी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.

‘सीआयडी 2’ मधील एक्झिटच्या चर्चेविषयी शिवाजी साटम म्हणाले की, सध्या मी सुट्टीवर आहे. हे पात्र मालिकेतून बाहेर पडेल की नाही याबद्दल मला कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यात आलेली नाही. तसंच आगामी चित्रीकरणाबद्दलही माहीत नाही. पार्थ समथानने ‘सीआयडी 2’ मध्ये शिवाजी साटम यांची जागा घेणार असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. पार्थ म्हणाला, ‘लहानपणापासून ही मालिका पाहत आलो आहे. ही एक आयकॉनिक मालिका आहे.