श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीत जलसमाधी

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. सनातन धर्मात साधू-संतांच्या अंतिम संस्कारासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक म्हणजे संताचे पार्थिव अंत्यविधी न करता नदीत विसर्जित करण्यात येते. त्याला जलसमाधी म्हणतात. याशिवाय संतांना भू-समाधीही दिली जाते. यामध्ये मृत शरीराला पद्मासन किंवा सिद्धीसनाच्या मुद्रेत बसवून जमिनीत गाडले जाते.

सत्येंद्र दास हे अयोध्याराम मंदिराचे मुख्य पुजारी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. निर्वाणी आखाड्यातून आलेल्या अयोध्येतील प्रमुख संतांपैकी ते एक होते. वयाच्या 85 व्या वर्षी बुधवारी त्यांचे निधन झाले.