
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यात फिर्यादीस धमकावले, न्यायालयाकडुन आरोपी लोकसेवक यांचा जामीन रद्द करून कारागृहात रवानगी केली.
अहमदपूर तालुक्यातील मोळवण चे सरपंच फिर्यादी मोहन वसंतराव दहिफळे, व्यवसाय शेती यांच्या तक्रारीवरून आलोसे बबन निवृतीराव नाडे, वय 50, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकरी, कार्यालय लातूर, वर्ग-3, पशुसंवर्धन व मत्स्य विकास खाते यांचे विरूध्द तक्रारदार यांना मौजे मोळवन साठवण तलावात सन-2015-16 मध्ये मत्सव्यवसाय करण्यासाठीचा ठेका मिळण्याचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालय संभाजीनगर येथे सादर करण्याच्या कामासाठी 2000/- रू. लाच पंचासमक्ष स्वतः स्विकारले वरून दि.12/05/2015 20:15 वा. पोस्टे शिवाजी नगर लातूर येथे गुरन गुन्हा नोंद झालेला असून सदर गुन्हयातील खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, साक्षीपुराव्यावर चालू असून सध्या फिर्यादी मोहन वसंतराव दहिफळे यांची साक्ष सुरू आहे. सदर गुन्ह्यातील आलोसे बबन निवृतीराव नाडे यांनी फिर्यादी मोहन दहिफळे यांना मा. कोर्टामध्ये साक्ष दे म्हणून धमकावत होते. सदर बाबत फिर्यादी यांनी मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने मा. जिल्हा व सत्र न्यायालय, क.३, लातूर यांनी यातील नमुद आलोसे बबन नाडे यांचा जामीन रद्द करून त्यांची जिल्हा कारागृह येथे रवानगी केली आहे. सदर खटल्यात सहायक सरकारी वकील सचिन चामले हे काम पाहत असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथील कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोह/भागवत कठारे हे सदर खटल्याचे कामकाज पहात आहेत.