
बंगळुरूमध्ये दोन मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या आरोपीला केरळमधून अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी तीन राज्यांमधील सुमारे 700 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅम केले. त्यानंतर केरळच्या एका दुर्गम गावातून त्याला पकडण्यात आले. आरोपीचे नाव संतोष (26 वर्ष) असे आहे. तो बंगळुरूमधील एका जग्वार शोरूममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. बंगळुरूच्या बीटीएम लेआऊट परिसरात 3 एप्रिल रोजी मुलींवर अत्याचार झाला. त्याचा सीसी टीव्ही व्हिडीओही समोर आला. पोलिसांनी तीन राज्यांमध्ये आठवडाभर शोधमोहीम राबवली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा तो बंगळुरूहून तामीळनाडूतील होसूरला पळून गेला. तो सेलम आणि नंतर केरळमधील कोझिकोड येथे पळून गेला. त्याला कोझिकोडमधील नरवणूर येथून अटक करण्यात आली.