हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला आज उल्हासनगर न्यायालयात आणले असता एका तरुणाने चप्पलच्या बॉक्समधून गांजा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसाच्या निदर्शनास आल्यानंतर हा तरुण सिमेंटची खिडकी तोडून न्यायालयातून पळून गेला. हर्षद सकट याला विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यात दत्तजयंतीला 14 डिसेंबर रोजी अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात आणले होते.